Fri, Nov 27, 2020 10:50होमपेज › Pune › 'शरद पवार छोटे नेते असतील, तर चंद्रकांत पाटील गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का?'

'शरद पवार छोटे नेते असतील, तर चंद्रकांत पाटील गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का?'

Last Updated: Nov 22 2020 12:41PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत प्रतीत्त्युर दिले आहे.

यावेळी अंकुश काकडे म्हणाले की, ज्यांचे दिल्लीतील नेते पवार साहेबांना गुरु मानतात, अनेक विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेतात अशा पवार साहेबांचा कमी अभ्यास असलेले छोटे नेते असे संबोधणारे चंद्रकांत पाटील यांनी एकदा त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशी जरूर चर्चा करावी. पवार साहेबांचा राजकारणातला, समाजकारणातला, सहकार, शिक्षण, कृषी क्षेत्रातला अभ्यास किती आहे हे चंद्रकांत पाटलांनी शिकून घ्यावे. अशी जोरदार टिका काकडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

आपण कुठून आलो आणि कुठे चाललोय हे ज्यांना  समजत देखील नाही त्यांनी पवार साहेबांबद्दल असे बोलणे हा सध्याच्या राजकारणातील एक विनोद आहे. अशा त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांच्या प्रतिमेला काडीचाही धक्का लागणार नाही, जर पवार साहेब छोटे कार्यकर्ते असतील तर चंद्रकांत पाटील गल्लीतले तरी कार्यकर्ते आहेत का? याचा त्यांनी जरूर विचार करावा एका राजकीय पक्षाच्या प्रांताध्यक्ष म्हणून जबाबदारीने बोलावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, परंतु कोल्हापूरमधून आलेलं हे पार्सल, त्याला शहाणपण सुचेल असे आम्हाला वाटत नाही.