पुणे : पुढारी ऑनलाईन
कोरोना संसर्गावर लस तयार करणार्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. मांजरीच्या बाजूकडे असलेल्या मागील गेटच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. (massive fire broken out at a plant of Serum Institute of India in Manjri area of Pune)
अधिक वाचा : बिग ब्रेकिंग : कोरोना लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागली आग
सिरम इन्स्टिट्यूमधील कर्मचार्यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर १० अग्निशमन दलाच्या गाड्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेले नाही.
अधिक वाचा : सिरम करणार पाच लसींची निर्मिती
देशात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. देशभरात सिरमची कोविशिल्ड लसीकरणासाठी पोहोचली आहे. देशात आपत्कालिन वापरासाठी सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान आग लागल्यानंतर सिरमने खुलासा केला आहे.
अधिक वाचा : सिरम आता लसीचे आणखी १० कोटी डोस तयार करणार
सिरमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या इमारतीत अन्य लसीची निर्मिती सुरु आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना लसीचे उत्पादन सुरु आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळ लस निर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही. आग लागलेल्या ठिकाणापासून कोविशिल्ड तयार होत असलेली इमारत दूर आहे. आग लागलेल्या इमारतीमधून आतापर्यंत तिघांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य एकाचा अजून शोध सुरु आहे. (massive fire broken out at a plant of Serum Institute of India in Manjri area of Pune)
अधिक वाचा : अदर पुनावाला यांनी स्वतःहून टोचून घेतली कोविड लस, शुभेच्छा देत शेअर केला व्हिडिओ