Mon, Jun 01, 2020 21:40
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › 'उमेदवार कोणत्या जातीचा आहे हे न बघता तो तुमच्या हाकेला ओ देणार की नाही इतकाच असायला हवा'

'उमेदवार कोणत्या जातीचा आहे हे न बघता तो तुमच्या हाकेला ओ देणार की नाही इतकाच असायला हवा'

Last Updated: Oct 18 2019 7:56PM

राज ठाकरेपुणे : पुढारी ऑनलाईन

मतदारसंघातील उमेदवार हा कोणत्या जातीचा आहे हे न बघता तो तुमच्या हाकेला ओ देणार की नाही? इतकाच असायला हवा. आणि कोथरूडबाबत म्हणाल, तर तुमचा आमदार इथलाच कोथरुडमधलाच हवा, कारण तो तुमच्या हाकेला कायम धावून येईल. चंद्रकांत पाटील कधीही हाताला तुमच्या लागणार नाहीत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

पूर्वी कधी नव्हतं इतका विचार हल्ली निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना तिथली जातीची गणितं आधी बघितली जात आहेत. हे असं महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. ज्या महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचार दिला तिथे जातीचा पातीचा विचार रुजतोय हे धोक्याचं आहे असे राज म्हणाले. 

राज म्हणाले, 

मतदारांना गृहीत धरून बाहेरचा उमेदवार लादला

मंत्री होते, जे मुळचे कोल्हापूरचे आहेत, ते कोल्हापूरमधून का राहिले नाहीत. तेथे उभे रहायला त्यांना भिती का वाटली.

पुराच्या पाण्यात वहात आले.

सत्ता डोक्यात गेल्यानंतर असे घडते, गृहीत धरून कोणताही उमेदवार कुठेही उभा केला जातो.

यापूर्वी जातीच्या प्रमाणावर कधीचे मानसं उभी केली जात नव्हती.

महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले.

त्या महाराष्ट्रात काय सुरू आहे. महाराष्च्राचा उत्तरप्रदेश व बिहार करायचा आहे का...

मागे राम गणेश गडकरींचा पुतळा पाडला... पुतळा काढणाऱ्यांना ते कोण होते ते तर माहिती होते का ?

आम्ही महापुरुषांना, समाजसेवकांना जातीत बांधून ठेवत आहोत.

आता मतदार संघ जातीत बांधली जात आहे.

मतदारसंघात काम करणारा हवा

कोथरूडची निवडणुक कोथरूडचा हवा की बाहेरचा यावर हवी 

चंद्रकांत पाटील निवडून आल्यावर हाती लागतील का ?

मनमोहनसिंग आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ज्ञ 

आर्थिक मंदीची सुरूवात आहे, अनेक गोष्टी भोगाव्या लागणार आहेत

तरूणांच्या नोकऱ्या जात आहेत 

हे केवळ एका व्यक्तीच्या एका निर्णयामुळे

मोदी यांनी नोटबंदी व जीएसटीचा निर्णय घेतला, आणि देशाची अधोगती सुरू झाली.

हा निर्णय चुकला तर देश खड्ड्यात डाईल, असे मी तेव्हाच सांगितलं होतं.

बँकेत पैसे अडकलेले लोक मरण पावत आहेत.

हे सर्व बाजूला सारून वेगळ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत.

भाजपचा खासदार वाहतूक कोंडीत अडकले म्हणून गाड्या उचलल्या जात आहेत. मग सामान्यांनी काय करायचे

सत्ताधारी लहर येईल तसे निर्णय घेत आहेत.

गेल्या पाच महिन्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

बहुमत मिळतंय मग प्रश्न का सुटत नाहीत

रस्ते अपुरे व वाहने जास्त आहेत, मेट्रोने हे प्रश्न सुटणार नाहीत.

मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याने वाहतुक व पार्कींगच्या समस्या निर्माण होत आहेत. गाड्या लावायला मोकळ्या जागाच नाहीत.

आम्ही पुढच्या पिढ्यांना इतिहासच सांगत नाही. आता तर गजकिल्ले लग्न समारंभाला आणि महाराजांचा इतिहास असलेला धडा पाट्यपुस्तकातून काढला जात आहे.

सरकारला कोणी प्रश्नच विचारणारे नाही.

 हे सर्व सत्ता डोक्यात गेल्याने घडत आहे. 

यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष हवा आहे.