Wed, Aug 12, 2020 20:22



होमपेज › Pune › ... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी बिबट्याच्या विष्ठेचा केला वापर!

... म्हणून सर्जिकल स्ट्राईकसाठी बिबट्याच्या विष्ठेचा केला वापर!

Published On: Sep 12 2018 6:36PM | Last Updated: Sep 12 2018 6:36PM



पुणे : पुढारी ऑनलाईन 

सर्जिकल स्ट्राईक मोहीम यशस्वी करताना कुत्र्यांच्या भुंकण्याचा अडथळा येऊ नये यासाठी बिबट्याच्या विष्ठेचा आणि मलमुत्राचा वापर करण्यात आला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिली. भारतीय लष्कराच्या यशाची शौर्यगाथा असलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पाकिस्तानला पाकिस्तानच्या भूमीत उत्तर २०१६ मध्ये देण्यात आले होते.  

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानकडून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार देण्यात आला. निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या यशाची माहिती देताना सांगितले की, मोहीम ज्या परिसरात यशस्वी करायची होती, तो परिसर पूर्ण पिंजून काढला होता. त्यावेळी बिबट्या कुत्र्यांवर हल्ला करत असल्याचे आमच्या ध्यानी आले. त्यामुळे बिबट्यांपासून वाचण्यासाठी स्थानिक परिसरात आसरा घेत होते. व्युहरचना यशस्वी होण्यासाठी आम्ही बिबट्याची विष्ठा आणि मलमूत्र सोबत नेले होते, कारण गावामध्ये गेल्यानंतर कुंत्रे भूंकून हल्ला करण्याची शक्यता होती. ही व्युहरचना यशस्वी झाली. 

निंभोरकर पुढे म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईक दरम्यान प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आठवडाभरात तयारी करण्याचा आदेश दिला होता, त्यानुसार सैनिकांशी चर्चा केली होती पण त्यांना जागेची कल्पना दिली नव्हती. दहशतवाद्यांच्या तळांची माहिती घेण्यात आली होती त्यानुसार  अभ्यास करून पहाटेची ३.३० ची वेळ निवडली. सर्व सैनिक ठरलेल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचले आणि मोहिम फत्ते करण्यात आली.