Thu, Jun 24, 2021 11:14
माळशेज घाटात कारवर दरड कोसळली; चहाच्या तलपीने दोघांना वाचवले

Last Updated: Jun 11 2021 8:01PM

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू होताच कल्याण-नगर महामार्गावरील अणे माळशेज घाटात अचानक उभ्या असलेल्या कारवर दरड कोसळली. याचबरोबर नगरकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुर्घटनाग्रस्त कारमधील दोन प्रवासी मित्रांनी चहा पिण्यासाठी कार रस्त्याकडेला पार्क केली होती. ते चहाच्या हॉटेलात पोहचताच कारवर दरड कोसळली. चहा घेण्यासाठी ते गाडीतून उतल्याने दोघेही बालंबाल बचावल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. 

दरम्यान सद्यस्थितीत घाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके पसरलेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.