Tue, Jul 07, 2020 07:32होमपेज › Pune › बारामती : छेडछाड करताना जाब विचारल्याने महिला सरपंचाच्या पतीचा निर्घृण खून

बारामती : छेडछाड करताना जाब विचारल्याने महिला सरपंचाच्या पतीचा निर्घृण खून

Last Updated: Jan 15 2020 4:45PM

संग्रहित छायाचित्रबारामती ः प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय 50) यांचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून करण्यात आला. बुधवारी (दि.15) रोजी दुपारी दोनच्या सुमारास सोनगावातील सोनेश्वर मंदिरालगत ही घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला.

बुधवारी सोनेश्वर मंदिरात गावासह पंचक्रोशीतील महिला संक्रातीनिमित्त ओवाळण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी तेथे संबंधित तरुण महिलांची छेडछाड करत होता. सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज यांनी त्याला याचा जाब विचारला. त्यावरून चिडून जावून त्याने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात थोरात हे जागीच ठार झाले. दरम्यान या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.