Tue, Jun 15, 2021 11:34
पुणे : तीन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू; शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील घटना

Last Updated: May 07 2021 6:31PM

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा मृ्त्यू
रांजणगाव गणपती : पुढारी वृत्तसेवा  

प्रशासनाचे ढीसाळ नियोजन व आरोग्य यंत्रणेच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर पडू लागली आहेत. तालुक्यातील कारेगाव येथील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांना काळाने हिरावून घेतल्याने कारेगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक वाचा : मुख्यमंत्री ठाकरे घरात बसून तर अजित पवार फक्त बैठकाच घेतात : संजय काकडे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १५ एप्रिल रोजी कोरोनाचे निदान झाल्यानंतर पोपट धोंडीबा नवले  (वय ५८) यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. मात्र २३ एप्रिलला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी २७ एप्रिलला दुसरा भाऊ सुभाष धोंडीबा नवले (वय ५५) यांच्यावर काळाने झडप घातली. तर ६ मे रोजी तिसरा भाऊ विलास धोंडीबा नवले (वय ५२) यांनाही काळाने हिरावून नेले.

अधिक वाचा : पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार?

या तीनही भावांच्या उपचारासाठी नवले कुटुंबिय आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. आँक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड, रेडमीसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले; मात्र त्यात त्यांना अपयश आले त्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावर उरला नाही. त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारा होता. शेतकरी कुटुंबातील निर्व्यसनी आणि अत्यंत कष्टाळू कायम दुस-यांच्या मदतीला धावा-या या तीन सख्ख्या भावांच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

अधिका वाचा : पुणे : उच्चशिक्षीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; दोन तरुणींसह चौघांवर गुन्हा!

एमआयडीसीतील उद्योग बंद ठेवण्याची गरज

मागील वर्षी राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहिर करण्याआधी कारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने १७ मार्च २०२० ला कारेगाव बंद ठेवण्यात आले होते. मात्र औद्योगिक वसाहत चालू ठेवल्याने या बंदचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शासनाने औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंदे बंद ठेवावेत जेणेकरुन कोरोनाचा फैलाव थांबण्यास मदत होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.