Mon, Aug 10, 2020 04:52होमपेज › Pune › पुणेः पतीची आत्महत्या तर पत्नीचा संशयास्पद मृत्यू 

पुणेः पतीची आत्महत्या तर पत्नीचा संशयास्पद मृत्यू 

Published On: Dec 17 2017 3:05PM | Last Updated: Dec 17 2017 3:08PM

बुकमार्क करा

पुणेः प्रतिनिधी 

बिबवेवाडी परिसरातील राजीव गांधी नगर येथे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नीचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकिस आला. रामदास चाळेकर (37), सारिका चाळेकर (30, दोघेही रा. राजीव गांधी नगर बिबवेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास चाळेकर व सारिका चाळेकर हे पती पत्नी राजीव गांधीनगर येथे राहण्यास आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. दरम्यान रविवारी सकाळी पेपर टाकणारा मुलगा पेपर टाकायला आला. तेव्हा त्याला रामदास देवकर यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले आहेत. दरम्यान दोघा पती- पत्नीमध्ये शनीवारी रात्री भांडण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.