Sat, Sep 19, 2020 08:41होमपेज › Pune › बारामती : शरीरसंबंधास पत्नीने नकार दिल्याने पतीकडून..

बारामती : शरीरसंबंधास पत्नीने नकार दिल्याने पतीकडून..

Last Updated: Jul 19 2020 5:28PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा
    
शरीरसंबंधाला नकार दिल्याच्या कारणावरून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडला. याप्रकरणी  वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.

अधिक वाचा : हुबळीत साकारतोय जगातील सर्वांत लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म

याबाबत सस्तेवाडीतील 25 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार शनिवारी (दि. 18)  रोजी ही घटना घडली. पत्नीने पतीला आपल्या घरी देवीच्या आरतीचा कार्यक्रम चालू आहे, तसेच माझा मणका खूप दुखतो असे कारण देत शरीर संबंधाला नकार दिला.

अधिक वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाला प्रवेश, चार इमारती सील

त्यावेळी आरोपीने चिडून जात शिवीगाळ करत तुला मारुन कालव्यात टाकतो असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने दरवाजाला आतील बाजूने लावलेला दगड हातात घेत तिच्या डोक्यात तीन-चारदा मारला. एका हाताने तोंड दाबत दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबला. पत्नीने हात सोडविला असता पतीने तिच्या गळ्यावर पाय दिला. त्यामुळे पत्नी पाय खोडू लागली. त्याचवेळी घराबाहेर कोणाचा तरी आवाज आल्याने पतीने तिच्या गळ्यावरून पाय काढला. 

अधिक वाचा : पुणे: जुन्नरच्या माजी नगराध्यक्षचा कोरोनामुळे मृत्यू

 "