Sat, Jan 25, 2020 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा पतीकडून खून

पुणे : अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा पतीकडून खून

Last Updated: Jan 15 2020 1:24PM

संग्रहित छायाचित्रशिक्रापूर (पुणे) : वार्ताहर 

पत्नीचे प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध उघड झाल्याने चिडून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १५ जानेवारी रोजी) शिक्रापूर येथे घडला. दिलावर शेख (रा. वाकत  ता. रिसोड जि. वाशिम) असे मृतकाचे नाव आहे. तर याप्रकरणी आयुब सिकंदर शेख (रा. रिसोड, जि. वाशिम) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : साध्वी ठाकूर यांना पाठविलेल्या ‘त्या’ पत्राचे पुणे कनेक्शन

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, आरोपी आयुब सिकंदर शेख याने मयत मोईन याचे आणि आपल्या पत्नीचे अनैतीक संबंध प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे चिडून जाऊन शेख याने मोईन याच्या डोक्यात हातोडी मारली. त्यातच दिलावर खान याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; उदयनराजेंचा टोला