Sat, Apr 10, 2021 20:35
पिंपरी : चिखलीत खोदकाम करताना सापडली ऐतिहासिक नाणी

Last Updated: Mar 09 2021 3:27PM

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

बांधकाम साईटवर खोदकाम करताना मिळालेली ऐतिहासिक नाणी बेकायदा जवळ बाळगणाऱ्या मजुरासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सन १७२० ते सन १७५० कालखंडातील २३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी आणि ५२५ ग्रॅमचा कांस्य धातूचा एक ताब्या जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना माहिती मिळाली, सलाम सालार खॉ पठाण (रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी) याने त्याच्या घरात सोन्याची नाणी बाळगली आहेत. त्यानुसार पोलिसांनी पठाण याच्या घरातून नाणी जप्त केली.

वाचा - पुणे : गुंड निलेश घायवळसह साथीदारांवर मोक्‍का; खंडणी विरोधी पथकाने केली अटक 

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पठाण याचे सासरे मुबारक शेख, मेव्हणा इरफान शेख (दोघेही रा. पाथरी, जि. परभणी) हे तीन ते चार महिन्यांपूर्वी मजुरीच्या कामासाठी पठाण याच्याकडे आले होते. ते दोघे चिखली येथील बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत होते. तेथे खोदकामाची माती फावड्याने भरत असताना सोन्याची पाच सहा जुनी नाणी त्यांना मातीत मिळून आली. ती नाणी त्यांनी सदाम पठाण याला दाखवली. दुसऱ्या दिवशी सदाम पठाण व त्याचा मेव्हणा मुबारक शेख यांनी मातीचा ढीग उकरून कास्य धातूसारखा तांब्या व सोन्याची नाणी मिळाली. ती नाणी त्यांनी सदाम याच्या घरी आणून ठेवल्याचे समोर आले आहे.