Sat, May 30, 2020 01:28होमपेज › Pune › एल्गार प्रकरणाची सूत्रे घेण्यासाठी एनआयए पोलिस आयुक्तालयात दाखल

एल्गार प्रकरणाची सूत्रे घेण्यासाठी एनआयए पोलिस आयुक्तालयात दाखल

Last Updated: Feb 19 2020 1:17AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

राज्य सरकार आणि न्यायालयाने एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर एनआयएने तपास आणि तपासासंदर्भात कागदपत्रे घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने एनआयएचे एल्गार प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस अधीक्षक विक्रम खलाटे सोमवारी पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. 

खलाटे यांनी तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडून खटल्यासंबंधी महत्वाची माहिती घेतली. त्यामुळे एल्गारचा तपासाची कागदपत्रे मुंबई येथील एनआयए न्यायालयात वर्ग करण्यास जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.