Wed, Apr 01, 2020 22:55होमपेज › Pune › पुणे : आयटी कंपनीतील तरूणीसोबत अनैसर्गिक कृत्य करणारा तरूण अटकेत  

पुणे : आयटी कंपनीतील तरूणीसोबत अनैसर्गिक कृत्य करणारा तरूण अटकेत  

Last Updated: Jan 22 2020 3:54PM

संग्रहित छायाचित्रपुणे/ येरवडा : पुढारी वृत्तसेवा 

झारखंड येथून पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीसाठी आलेल्या तरूणीसोबत अनैसर्गिक कृत्य करून तिला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तरूणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.  प्रवीण नद्यालकर (29, रा. हरिओम सोसायटी, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीत तरूणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 नोव्हेबर ते 9 डिसेंबर 2019 दरम्यान घडला. पीडित मुलीचे आई-वडील झारखंड येथून पुण्यात आल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. 

पीडिता झारखंड येथून नोकरी निमित्ताने पुण्यात आली होती. प्रविण हा ऑनलाईन नामांकित कंपनीत डाटा एन्ट्रीचे काम करतो. पिडीत मुलगी पुण्यात आल्यानंतर तिची प्रविणबरोबर मे 2009 मध्ये ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी व प्रवीण यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दि. 16 नोव्हेंबर 2019 रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी जाऊन प्रवीणने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तिने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देवून तो निघून गेला. 

त्यानंतर 9 जानेवारी 2019 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रवीण पुन्हा पिडीतेच्या घरी गेला. मला तुझी माफी मागायची आहे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. पोलिसात जाऊन तक्रार देते म्हणाल्यानंतर पुन्हा त्याने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले. याप्रकरणी प्रविण याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुजावर करत आहे.