Tue, Aug 11, 2020 21:33होमपेज › Pune › पुणे : विजयस्तंभ मानवंदनेस येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा देणार

पुणे : विजयस्तंभ मानवंदनेस येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा देणार

Last Updated: Dec 14 2019 2:44PM
कोरेगाव भीमा (पुणे) : प्रतिनिधी

१ जानेवारी २०२० रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच यावेळेस मागील वर्षी पेक्षा चांगल्या सुविधा देण्यात येतील असे मत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले. तसेच पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच येणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा असे मत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मांडले.

पेरणे फाटा, ता. हवेली येथील विजयस्तंभ परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, आरोग्य, विद्युत तसेच पोलीस प्रशासनाच्या काढावा बैठकीत बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी, शिरूर हवेलीचे तहसीलदार, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महसूल आदी उपस्थित होते. 

यावेळी मागील वर्षी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे कौतुक करताना काही सूचना मांडण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडी, लाईट, पाणी आरोग्य आदी सूचनांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी १ जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभावर मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या वाहन तळांची पाहणी केली.