Wed, Apr 01, 2020 00:28होमपेज › Pune › बारामती : तरडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा

बारामती : तरडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा

Last Updated: Jan 22 2020 6:01PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामतीच्या अप्पर पोलिस अधिक्षकांच्या गुन्हे शाखेने तरडोली (ता. बारामती) येथील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन चाकी आणि चारचाकी वाहनांसह पोलिसांनी सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्याकडे यासंबंधीची तक्रार आली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईचे आदेश गुन्हे शाखेला दिले. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक राजाराम साळुंखे यांच्यासह सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, विशाल जावळे, संजय मोहिते तसेच आरसीपी पथकातील १२ कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता.

अधिक वाचा : पुणे : आयटी कंपनीतील तरूणीसोबत अनैसर्गिक कृत्य करणारा तरूण अटकेत  

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात अमोल किसन मदने (वय २८, रा. निरावागज, ता. बारामती), मंगेश धोंडीबा कटांबळे (वय ५०),किरण राजू माने (वय ४२, दोघे रा. निरा, ता. पुरंदर), विजय जगन्नाथ जाधव (वय ३५, रा. डाळज, ता. इंदापूर), दादासो विठ्ठल जायपत्रे (वय ३२, रा. मुढाळे, ता. बारामती), उत्तम किसन पवार (वय ४५, रा. तरडोली, ता. बारामती), विजय शिवाजी चव्हाण (वय ४५), दिलीप शंकर चव्हाण (दोघे रा. मुर्टी, ता. बारामती), राजेंद्र दादासो शिंदे (वय ५४, रा. सांगवी, ता. बारामती), सागर सुभाष वाघमारे (वय ३५, रा. कांबळेश्वर, ता. बारामती), जमिर अमिन सय्यद (वय २७, रा. कसबा, बारामती), परशुराम गंगाराम खोमणे (वय ३०, रा. मावडी, ता. पुरंदर), संजय मारुती खाडे (वय ४४, रा. पळशी, ता. बारामती), रामचंद्र बबन कर्नावळ (वय ५२, गुळुंचे, ता. पुरंदर), मोहन पांडूरंग गावडे (रा. आंबी, ता. बारामती), सुरेश सदाशिव मोहिते (रा. निरा, ता. पुरंदर) तसेच बाळासाहेब भापकर व दत्ता लोणकर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अधिक वाचा : पुणे : धानोरीमध्ये किरकोळ वादातून युवकाची हत्‍या 

मंगळवारी (दि.२१) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन लाकडी गोल टेबल, २० प्लास्टिक खुर्च्या, दोन पत्त्यांचे कॅट, सुमारे ८० हजार रुपयांची रोख रक्कम, बारा मोबाईल हॅण्डसेट तसेच सात दुचाकी व एक टाटा सफारी वाहन असा सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल मदने, बाळासाहेब भापकर व दत्ता लोणकर यांच्याकडून हा क्लब चालविला जात होता.