Wed, Aug 12, 2020 08:34होमपेज › Pune › पुणे : कलाकारांनी नटराजाला पडदा उघडण्यासाठी घातले साकडे  (video)

पुणे : कलाकारांनी नटराजाला पडदा उघडण्यासाठी घातले साकडे  (video)

Last Updated: Jun 26 2020 1:44PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा 

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन सोहळा २६ जून रोजी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येतो. बालगंधर्व रंगमंदिराचा यंदाचा ५३ वा वर्धापन दिन सोहळा मात्र साधेपणाने साजरा झाला. कोरोनासारख्या विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व सरकारच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, मेघराज राजेभोसले, लक्ष्मीकांत खाबिया व मोजकेच पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. ५३ वा वर्धापन दिनी नटराजाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात सोहळा पार पडला .

सोहळ्याच्या आठवणींना उजाळा देताना मेघराज राजेभोसले म्हणाले, 'बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन बालगंधर्व परिवाराच्यावतीने १४ वर्षे साजरा केला जातो. तसेच हा सोहळा ३ दिवस साजरा होतो. पुण्यातील सर्व कलाप्रेमींसाठी एक पर्वणी असते. यात भावगीत, भक्तीगीतापासून लावणीपर्यंत सर्व कला अविष्कार साजरे केले जातात. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असतात. सकाळी जादूचे प्रयोग, भावगीत, भक्तीगीत, लोकधारा, एकपात्री प्रयोग, महिलांसाठी लावणी, संगीत रजनी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती, सिनेसृष्टीतील अनेक गाजलेले कलावंत या महोत्सवात आतापर्यंत सहभागी झालेले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांचा मेळावा पाहायला मिळायचा. 

दरम्यान, कलाकारांनी नटराजकडे पडदा उघडण्यासाठी साकडे घातले आहे.