Fri, Sep 18, 2020 19:58होमपेज › Pune › पुण्याच्या पालकमंत्र्यांचा अधिकार्‍यांवर वचक नाही : अजित पवार (Video)

पुण्याच्या पालकमंत्र्यांचा अधिकार्‍यांवर वचक नाही : अजित पवार (Video)

Published On: Sep 27 2018 5:57PM | Last Updated: Sep 27 2018 5:57PMपुणे : प्रतिनिधी

खडकवासला धरणातून या कालव्याद्वारे आज पाणी सोडले जात नाही, ते वर्षानुवर्षे केले जात आहे. कालव्यात पाणी असतानाही यापूर्वी कालव्याच्या दुरूस्तीची कामे झाली आहेत.

पालकमंत्र्यांनी स्वत: कालव्याची पाहणी केल्यानंतर दुरूस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी स्वत: लक्ष घालून कालव्याच्या काम करून घेणे गरजेचे होते. मात्र त्यांचा प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर वचक नाही, त्यामुळे त्यांचा आदेश प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी केली. त्याची परिणीती आजच्या घटनेमुळे समोर आली असल्याचेही त्यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.