Wed, Jan 20, 2021 00:41होमपेज › Pune › 'राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द'

'राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द'

Last Updated: Jul 03 2020 3:16PM

कृषिमंत्री दादा भुसेपुणे  : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवार (ता.३) कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षातील अंतर्गत परीक्षेचे गुण आणि गेल्या दोन वर्षातील मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर आधारित गुण घेऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. राज्यातील २३० कृषी विद्यालय आणि  कृषी तंत्रनिकेतनमधील मिळून सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा  होणार आहे.

अधिक वाचा : बारामती : बेकायदा सावकारी; तिघांविरोधात गुन्हा   

राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक शुक्रवारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महाविद्यालयात झाली. त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ,  कृषी परिषदेचे शिक्षण संचालक हरिहर कौसडीकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा :'ठाकरे सरकार'ची केंद्राकडे १० हजार कोटींची मागणी 

यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले की,  राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती तसेच लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. राज्यातील दोन वर्षे पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच तीन वर्ष तंत्रनिकेतन विभागाचे विद्यार्थी यांची शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार आहे. या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल. 

अधिक वाचा : मोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लाँचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली होती. त्यानुसार साकोली मध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला आज मंजुरी देण्यात आली. अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी याठिकाणी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू होईल असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.