Wed, Aug 12, 2020 02:56होमपेज › Pune › पुणे : पाटस कुरकुंभ घाटात बस पलटी, एक जागीच ठार

पुणे : पाटस कुरकुंभ घाटात बस पलटी, एक जागीच ठार

Published On: Dec 08 2017 8:55PM | Last Updated: Dec 08 2017 8:55PM

बुकमार्क करा

पाटस: प्रतिनिधी 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ पाटस घाटात पाटस हद्दीत शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास एक लक्सरी बस  (के ए ३९ ए ०००६) उलटली. या बस मधील एक व्यक्ती जागीच ठार झाला. तर पाच व्यक्ती जखमी झाले आहेत.

पाटस हद्दीत कुरकुंभ घाटातील उताराजवळ लक्झरी बस भरधाव वेगात असताना ती कंट्रोल न झाल्याने कुरकुंभ घाटाच्या जवळ रोडच्या कडेच्या खडडयात जाऊन पलटी झाली.  या अपघातात डिकीत झोपलेला बसचा दुसरा चालक जागीच ठार झाला. 

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार  दि. 08 रोजी रात्री साड्डे तीन वाजण्याच्या सुमारास सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या लक्झरी बसचा चालक आबूमियॉं हबीबसाब पठाण याचेर बसवरील  नियंत्रण सुटुन बस कुरकुंभ घाटाच्या जवळ खडयात जाऊन डाव्या बाजुला पलटी झाली. या अपघातात डीकीत झोपलेला दुसरा ड्रायव्हर शिवराज हैबती संगम वय ५४ वर्षे रा. वॉटर कॉलनी बिदर याचा जागीच मृत्यू झाला. तसेच बस मधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बसचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाटस पोलिस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब पानसरे हे करीत आहेत .