Thu, Jun 04, 2020 20:44होमपेज › Pune › बारामती : माळेगाव साखर कारखान्यात कामगारांचा अपघात  

बारामती : माळेगाव साखर कारखान्यात कामगारांचा अपघात  

Last Updated: May 23 2020 12:49PM

संग्रहित छायाचित्रशिवनगर : पुढारी वृत्तसेवा

शिवनगर (ता.बारामती) येथील माळेगाव साखर कारखान्यातील बारा कामगारांचा शनिवार (दि.२३) रोजी सकाळी अपघात झाला. पॅन टाकी साफ करताना सदरची दुर्घटना घडली. सध्या साखर कारखान्यात हंगाम बंदची कामे सुरू आहेत. 

कारखान्यामध्ये टाकी साफ करताना पाणी सोडले असता गॅस तयार होऊन कामगार बेशुध्द पडले. बारामती येथील खासगी रुग्णालयात कामगारांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये पाच कामगार आय.सी.यु. मध्ये असून, त्यांना धोका नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वाचा :पुण्यातील डॉक्टरचा 'कोरोना'मुळे मृत्यू