Thu, Jul 09, 2020 20:07होमपेज › Pune › ‘एमआयडीसी’तील सांडपाण्याची जबाबदारी आमची नाही 

‘एमआयडीसी’तील सांडपाण्याची जबाबदारी आमची नाही 

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:55PM

बुकमार्क करा

पिंपरी : संजय शिंदे

औद्योगिकनगरीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम पालिकेचे नाही असे पालिका पर्यावरण विभागाचे म्हणणे आहे; परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार पालिका आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने सामाईक सांडपाणी शुद्धिकरण (सीईटीपी) प्रकल्पासाठी एमआयडीसीने जवळपास दीड ते दोन एकर जागा पालिकेच्या ताब्यात दिली आहे; मात्र त्या प्रकल्पाला गती मिळत नसल्यामुळे औद्योगिकनगरीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पालिका पर्यावरण विभागाच्या मतानुसार दोन वर्षापूर्वी कुदळवाडी-जाधववाडी नाल्याचे अ‍ॅसिड वॉश मिश्रीत पाणी इंद्रायणी नदीमध्ये मिसळत होते. त्याचा पंचनामा करुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 5 फेब्रुवारी 2016 मध्ये आयुक्त, पर्यावरण विभाग अधिकारी व सहशहर अभियंता यांच्यावर न्यायालयात दावा दाखल केला आहे.  त्यानंतर  सहशहर अभियंता  यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबतन्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये सांडपाणी गोळा करण्याचे जलवाहिन्याचे जाळे नाही. त्यामुळे सांडपाणी गोळा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी चिखलीसह इतर दोन ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प (एसटीपी) सुरू करण्यात येणार आहेत.  त्याठिकाणी न गोळा होणारे सध्याचे सांडपाणी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करुन ते पुनर्वापर करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे.  मात्र औद्योगिक पट्यातील सांडपाण्याचे काय असा प्रश्‍न पुन्हा अनुत्तरीच रहात आहे.