Wed, Jan 20, 2021 21:34होमपेज › Pune › पिंपरी : चिखलीत तरूणाचा भोसकून खून

पिंपरी : चिखलीत तरूणाचा भोसकून खून

Published On: Dec 23 2017 1:33PM | Last Updated: Dec 23 2017 1:33PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

चिखली मोरेवस्ती येथे किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.22) रात्री घडली. दिनेश निवृत्ती पाटील (२५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अतुल गाडे हा गंभीर जखमी आहे.

या प्रकरणी पोलिसांनी समाधान रामदास मोरे (२४) आणि चेतन रामदास मोरे (२०) या दोन भावांना अटक केली आहे. माझ्याकडे काय बघतोय ? असे म्हटल्याने आरोपी आणि मयत तरूणामध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भांडण झाले. यातून आरोपींनी चाकू पोटात भोसकून दिनेश यांचा खून केला तर अतुल याला गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.