पुणे : गृह विभागाच्या वतीने राज्यातील 101 सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपअधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यामध्ये परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांनादेखील नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
यामध्ये शहर पोलिस दलातील तीन आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील एका सहायक आयुक्तांचा समावेश आहे. सहायक आयुक्त प्रीती टिपरे यांची सोलापूर शहर, समीर शेख यांची नाशिक शहर, तर डॉ. शिवाजी पवार यांची पालघर येथील नालासोपारा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांची पुणे लोहमार्ग येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे़
पुण्यात आलेले सहायक पोलिस आयुक्त
सहायक आयुक्त मच्छिंद्र चव्हाण व सुरेंद्र देशमुख (लोहमार्ग, मुंबई), मालोजीराव पाटील (खाटमोडे) (राज्य नियंत्रण कक्ष, मुंबई), वैशाली शिंदे (सोलापूर शहर), लक्ष्मण बोराटे (पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, वाचक).
अनिकेत भारती यांची महामार्ग सुरक्षा पथक, पुणे येथे तसेच परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची लोणावळा, उपविभाग येथे बदली झाली आहे़ राज्य गुन्हे अन्वषण विभागात अपर पोलिस अधीक्षकपदी वैशाली माने (अमरावती), नंदा पारजे (वाशिम, मंगळूरपीर उपविभाग), आरती बनसोडे (औरंगाबाद, गंगापूर उपविभाग) यांची बदली झाली आहे़ तसेच बार्शी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संजय नाईक पाटील यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.