Thu, Sep 24, 2020 10:43होमपेज › Pune › पुण्यातील नाईट लाईफवर आदित्य ठाकरेंकडून 'पुणेरी'उत्तर!

पुण्यातील नाईट लाईफवर आदित्य ठाकरेंकडून 'पुणेरी'उत्तर!

Last Updated: Jan 23 2020 1:48AM

संग्रहित छायाचित्रपुढारी ऑनलाईन डेस्क 
 

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई नाईट लाईफवर अंतिम निर्णय झाला. येत्या सोमवारपासून म्हणजेच २७ जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी राज्य सरकारने दिली. या निर्णयाची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. 

पत्रकार परिषदेत त्यांना मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरु करणार का? असे विचारण्यात आले. यावेळी त्यांनी पुणेरी उत्तर देऊन सर्वांनाच चकित केले. पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरु करतोय असे म्हणताच एकच हशा पिकला.

अधिक वाचा : मुंबईत २७ जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’; मंत्रिमंडळाची मंजुरी

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 'रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नसेल. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील.

अधिक वाचा : सीएम उद्धव ठाकरे अयोध्येला कधी जाणार? संजय राऊतांनी सांगितला दौऱ्याचा कार्यक्रम!

मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकानं सुरू ठेवणे बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यासोबतच, पब आणि बार रात्रभर चालतील असे जे नेते म्हणत आहेत, त्यांनी कदाचित जीआरच वाचलेला नाही. त्यांनी जीआर वाचावा, असे उत्तर ठाकरे यांनी नाईटलाईफच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना दिले.

अधिक वाचा : 'नाईटलाईफ'चा घाट कोणाचा बालहट्ट पुरविण्यासाठी?; प्रवीण दरेकरांचा सवाल 

 "