पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
Responsive image


पिंपरी : प्रतिनिधी

झोपेत पाच वर्षांच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोटदुखीने त्रस्त असलेल्या मुलीवर उपचार केल्यामुळे हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 7) हा प्रकार उघडीकस आला. बावधान (ता. मुळशी) येथे हा प्रकार घडला. संबंधित मुलीच्या 30 वर्षीय पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आईने तक्रार दिली आहे. त्यांच्या पाच वर्षीय मुलीला पोटात दुखत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी नेले. तपासणीत डॉक्टरांनी हा गंभीर प्रकार तिच्या आईच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावर वडिलांनी गैरवर्तन केल्याचेे सांगितले. आईने रात्री झोपेचे सोंग घेत पतीच्या हालचालींवर  नजर ठेवली. त्यावेळी पती मुलीशी अश्लील चाळे करत असल्याचे निदर्शनास आले. विचाराणी केली असता, फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

लॉकरमधील दागिन्यांचा अपहार
पिंपरी ः कोटक महिंद्रा बँकेच्या निगडी, प्राधिकरण  शाखेतील लॉकरमधून चोरी झाली आहे. ग्राहकांचे 1 लाख 40 हजाराचे दागिने बँकेतील कर्मचार्‍याने काढून घेतले आहेत. जून 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. तुर्तास, कोणालाही अटक केली नसून, घटनेचा कसून तपास सुरु असल्याची माहिती  तपास अधिकारी आर. एम. भोये यांनी दिली.  कर्नल सचिन रघुनाथ टिळेकर (निवृत्त) यांनी याप्रकरणी निगडी पोलिसात  दिली आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.  प्राधिकरणात से. क्र.  25 मध्ये कोटक महिंद्रा बँक आहे.  बँकेत फिर्यादी टिळेकर यांचे खाते आहे. त्यांनी बँकेची लॉकर सेवा घेतली आहे. त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये त्यांचे व पत्नीचे 1 लाख 40 हजार रुपयांचे दागिने ठेवले. मात्र, 4 नोव्हेंबरला त्यांना लॉकरमधून दागिने गायब झाल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महिलेचा विनयभंग
पिंपरी : दुचाकीवरील महिलेचा पाठलाग करुन तिच्या मुलीसमोर अश्लिल इशारा केल्याप्रकरणी  एकावर गुन्हा दाखल केला आहे.   बुधवारी (दि. 6) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पिंपळेगुरव येथे हा प्रकार घडला. भास्कर गौतम खैरनार (वय 50, रा काशीदपार्क, पिंपळेगुरव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी संबंधित 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. संबंधित महिला व आरोपी यांच्यामध्ये तोंड ओळख होती. भास्कर याने त्या ओळखीचा गैरफायदा घेत फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. तसेच महिलेकडे पाहून अश्लिल हातवारे केले. 

शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले
पिंपरी ः पादचारी शिक्षिका महिलेचे 60 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हिसकावले. बुधवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील श्रीधरनगर रस्त्यावर हा प्रकार घडला. जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. लक्ष्मी श्रीधरनगर लिंक रस्त्यावरील इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका आहे. तेथे जवळच्या अर्पाटमेंटमध्ये त्या राहण्यास आहे. लहान मुलीला क्लासला सोडवून घरी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले.

सव्वा दोन लाखाची घरफोडी
पिंपरी : दरवाजाचे लॉक तोडून चोरटयांनी आतील सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला. यमुनानगर येथील सेक्टर 21 मध्ये गुरुवारी (दि. 7) हा प्रकार उघडकीस आला. रामचंद्र कृष्णाजी कागदलकर यांनी फिर्याद दिली आहे. कागदलकर यांची सदनिका 3 ते 7 नोव्हेंबरपर्यंत कुलूप लावून बंद होती. त्या दरम्यान, चोरटयांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटाचे लॉक तोडून दागिने आणि रोकड असा 2 लाख 24 हजारांचा ऐवज चोरुन नेला. 

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू
पिंपरी ः भरधाव दुचाकीची धडक बसल्याने पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी पावणेसातच्या सुमारास पांजरपोळ येथे ही घटना घडली. दत्तात्रय सावंत (वय 65, रा. पांजरपोळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. राहुल दत्तात्रेय सावंत (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. दत्तात्रय गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास पांजरपोळ येथे पुणे-नाशिक रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी वेगातील दुचाकीची त्यांना धडक बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सावंत यांचा मृत्यू झाला.