Fri, Sep 18, 2020 23:06होमपेज › Pune › पुणेः व्यावसायिकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, २१ लाखापेक्षा अधिक किंमतीचा ऐवज चोरी

पुणे : व्यावसायिकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Last Updated: Sep 16 2020 12:43PM
पुणेः पुढारी वृत्तसेवा 

वाकडेवाडीत एका व्यावसायिकाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी ३८ तोळे सोन्याचे दागिने, पाच किलो चांदी व तीन लाखाची रोकड असा तब्बल २१ लाख २०  हजाराचा किंमती ऐवज चोरट्यांनी चोरी करून पोबारा केला. ही घटना १५ ए भाले इस्टेट गारवे होंडा शोरुमच्या पाठीमागे वाकडेवाडीत घडली. याप्रकरणी प्रशांत मनोहर आभिनभावी (वय.५०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाचा : कोव्हीशिल्डच्या मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आभिनभावी हे व्यावसायिक आहेत. काही कामानिमीत्त ते बाहेर गेले होते. त्यामुळे सोमवार (दि.14) पासून त्यांचे राहते घर बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप कापून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे, चांदी व रोकड असा २१ लाखापेक्षा अधिक किंमतीचा एवज चोरी करून पळ काढला. 

वाचा चंबळ नदी पार करताना राजस्थानात बोट उलटली; १४ बुडाल्याची भिती

फिर्यादी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी खडकी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

वाचा कांदा निर्यातबंदीवर उदयराजेंनी भाजपला दिला घरचा आहेर!

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे निरीक्षक पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करत तपासाच्या सुचना दिल्या. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक पठाण करत आहेत.

 "