Sun, Mar 29, 2020 08:40



होमपेज › Pune › पुणे : सोशल डिस्टन्सिंग पाळा

पुणे : सोशल डिस्टन्सिंग पाळा

Last Updated: Mar 26 2020 7:00PM




पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात बहुतांशी नागरिक लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असून अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरु आहे. याकाळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी एक मीटरचे अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

अधिक वाचा : 'पीएमपीएमएल'कडून नायडूतील रूग्णांना घरी पोहोचविण्यासाठी बससेवा

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन रात्रंदिवस कार्यरत असून या सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यास रस्त्यात अडवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.

अधिक वाचा : ससूनची नवीन इमारत झाली कोविड-१९ हॉस्पिटल

शेतकऱ्यांनी पीक काढणीची कामे सामाजिक शिष्टाचार पाळून व योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत. अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांनी वाहनांवर स्टिकर लावावेत. 

अधिक वाचा : अडीच तासांत कोरोनाचा चाचणी अहवाल

सद्यपरिस्थितीतही ५ ते १० टक्के नागरिक कोणतेही कारण सांगून घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

अधिक वाचा : अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी