Mon, Aug 10, 2020 05:33होमपेज › Pune › पिंपरी चिंचवड शहरात कडक बंद; पोलिस बंदोबस्त तैनात

पिंपरी चिंचवड शहरात कडक बंद; पोलिस बंदोबस्त तैनात

Published On: Jan 03 2018 1:01PM | Last Updated: Jan 03 2018 1:01PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पिंपरी-चिंचवड शहरात बुधवार सकाळच्या वेळी पुर्णपणे बंद आहे. विविध भागातून भिमसैनिक एकत्र रस्त्यावरुन घोषणाबाजी करत निघत आहेत. काही चौकामध्ये थोड्या वेळासाठी रस्ता रोको करण्यात आला. तसेच तुरळक दुकाने उघडे ठेवणार्‍यांना बंद करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी आकरा पर्यंत शहरात बंद शांततेत कडक सुरु आहे.

पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात आहे. सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अतिरीक्त बंदोबस्त तैनात केलेला आहे. सगळीकडे पोलिस छावणीचे स्वरुप पाहयला मिळत आहे. 

शहरात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सोडली तर बाकी कोणतीच दुकाने उघडलेली नाही. नेहमी सकाळच्यावेळी कार्यालयात, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी असणारी गर्दी तुरळक दिसत होती. पीएमपीएमएल बस, तसेच खासगी वाहने, रिक्षा सुरु आहेत.