Thu, Jan 28, 2021 08:00होमपेज › Pune › पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!

पुण्यात निर्णयांचा धडाका सुरुच; मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली!

Last Updated: Jul 11 2020 8:08PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

कोरोना साखळी तुटत नसल्याने पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयावरून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच आता मनपा आयुक्तांची सुट्टी करण्यात आली आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : खासदार गिरीश बापटांच्या 'त्या' आरोपांवर अजित पवारांनी केला स्पष्ट खुलासा!

आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. शेखर गायकवाड यांच्याकडे पुन्हा साखर आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे.

अधिक वाचा : पुण्यात अजित पवारांकडून लॉकडाऊन घोषित; गिरीश बापटांकडून टीकास्त्र! 

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना त्या पदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता पीएमआरडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.