Thu, Jan 28, 2021 21:00
'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा शरद पवारांनी गांभीर्याने विचार करावा'

Last Updated: Jan 14 2021 6:44PM
पुणे ः पुढारी वृत्तसेवा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरम्यान भाजपने धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर रान उठवले आहे. याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर भाष्य केले आहे. शरद पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

अधिक वाचा : 'संभाजीनगर'चा विषय सभागृहात मांडणार'

राज्यात वंचित बहुजन विकास आघाडीच्या बॅनरखाली प्रत्येक जिल्ह्यात २७ जानेवारीला दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे आंदोलन होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. 

औरंगाबाद शहराच्या नामातंराच्या प्रश्‍नानंतर आता उस्मानाबाद शहराचे नाव बदल्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात विचारले असता, अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावं. तर राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे. 

अधिक वाचा :  हिवरेबाजारमधील तीन दशकांपासूनची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित

मुंडे यांनी निवडणूक आर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील माहिती लपवल्याचा आरोप करत काहीजण निवडणूक आयोगाकडे गेले आहेत. त्यावर बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, मुंडे यांचा राजानामा किंवा आमदारकी रद्द करणे हा न्यायालयाचा विषय आहे. परंतु काहीजण निवडणूक आयोगाकडे गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचे कौतूक वाटते, अशी मिश्किल टिप्पणी आंबेडकर यांनी केली. 

एनआरसी विरोधात दिल्लीत आंदोलन सुरु असताना पंजाब, हरियाणा व इतर राज्यातील शेतकर्‍यांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला होता. आता शेतकरी आंदेलन करत आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात २७ जानेवारीला वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.