Tue, Jul 14, 2020 12:56होमपेज › Pune › संत चांगावटेश्‍वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना (Video)

संत चांगावटेश्‍वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना (video)

Last Updated: Jun 30 2020 5:10PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र एसटीने काही निवडक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. यामध्ये सासवडमधील संत चांगावटेश्‍वर महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. आज (दि. ३० जून) दुपारी दोन वाजता फुलांनी सजवलेल्या एसटी बस मधून टाळ मृदगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात सासवडमधून महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. संत चांगावटेश्‍वर महाराज यांची पालखी पोलिस बंदोबस्तात पंढरपूरकडे रवाना झाली आहे.