Tue, Jul 14, 2020 12:06होमपेज › Pune › संत तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्‍थ होणार (video)

संत तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्‍थ होणार (video)

Last Updated: Jun 30 2020 11:20AM
पुणे : पुढारी वृत्‍तसेवा

संत तुकाराम महाराजांच्या पादुका आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. पादुका घेऊन निघालेल्या वैष्णवांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मुख्य मंदिरामध्ये पहाटेपासूनच काकडा आरती आणि पांडुरंगाची पूजा, राम मंदिर पूजा संपन्न झाली.

भजनी मंडपात भजनाचे स्वर टिपेला पोहोचले आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत... असा भोळा भक्तीभाव प्रत्येक वारकऱ्यांच्या श्रीमुखावर दिसत आहे.