Tue, Aug 04, 2020 13:01होमपेज › Pune › बारामती : लग्नाचे अमिष दाखवत गोजूबावीत युवतीवर बलात्कार

बारामती : लग्नाचे अमिष दाखवत गोजूबावीत युवतीवर बलात्कार

Last Updated: Jul 13 2020 5:35PM

संग्रहित छायाचित्रबारामती :  पुढारी वृत्तसेवा

लग्नाचे अमिष दाखवत एका २० वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकाविरोधात, तर तिला जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी त्याच्या आईविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बारामती शहरानजीक गोजूबावी येथे घडली. सौरभ बाळासो आटोळे व भीमाबाई बाळासो आटोळे (रा. जाधववस्ती, गोजूबावी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पुणे : तरुणावर गोळ्या झाडून खून

याबाबत बारामती तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सौरभ याने पिडीत युवतीला लग्नाचे अमिष दाखवत गोजूबावी येथील तिच्या मामाच्या घरी तसेच बारामती-भिगवण रस्त्यावरील टोलनाक्याच्या पुढील एका लॉजवर नेत तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. हा प्रकार दि. २८ मार्च ते ११ जुलै या कालावधीत घडला.

त्यानंतर पिडीत युवतीने लग्नाची मागणी केली असता सौरभ आणि त्याची आई भीमाबाई हिने तिला जातीवाचक शिविगाळ केली. त्यानंतर आपली फसवनूक झाल्याचे कळताच तिने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांत आरोपींविरूद्ध बलात्कार तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत.