पुणे : पुढारी वृत्तसेवा
घरातून अवघ्या सात किमी अंतरावर रुग्णालयात रुग्णाला पोहोचविण्यासाठी एका रुग्णवाहिका चालकाने तब्बल आठ हजार रुपये भाडे आकारल्याने आरटीओकडून या रुग्णवाहिकेवर धडक कारवाई करण्यात आली. तसेच, यासंदर्भात बिबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
अधिक वाचा : बारामतीत एक लाखाचा पकडला गांजा
रुग्णवाहिका चालक जादा दराने भाडे आकारत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांना आदेश दिले, यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली.
अधिक वाचा : काश्मीरमध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती
तसेच, जादा भाडे दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तरी देखील एखादा रुग्णवाहिका चालक ज्यादा दर आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.