Sun, Sep 27, 2020 02:36होमपेज › Pune › 'व्हॅलेंटाईन डे'ला पुणे पोलिस आयुक्तांची 'चाय पे चर्चा' (video)

'व्हॅलेंटाईन डे'ला पुणे पोलिस आयुक्तांची 'चाय पे चर्चा' (video)

Last Updated: Feb 15 2020 1:10PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

व्हॅलेंटाईन डे हा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस. हा दिवस आज पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पुणे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पुण्यातील तरुणाईला सोशल मीडियाच्या माध्यमातून 'चाय पे' चर्चाचे आवाहन केले होते. या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

गेल्या काही दिवसांमध्ये सायबर क्राइम वाढल्याच्या तक्रारी सतत होत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. पोलिस आयुक्तालयाचे काम कसे चालते, कोणते कोणते विभाग काय काम करतात याची माहिती यावेळी तरुणांना देण्यात आली. तसेच एखादी घटना घडल्यास पोलीसांशी कसा संपर्क साधावा याबाबत माहिती देण्यात आली. या‌वेळी तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिस आयुक्तांनी सविस्तर उत्तरे दिली.

 "