Thu, Aug 06, 2020 03:58होमपेज › Pune › पुणे : एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून, स्वतःवरही केले वार 

पुणे : एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून

Last Updated: Aug 02 2020 1:34AM

संग्रहित छायाचित्रपिंपरी : पुढारी वृत्तसेवा 

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने महिलेचा चाकूने वार करून खून केला. त्यानंतर स्वतःवरही वार करून घेतले. ही घटना शनिवारी (दि. १) दुपारी दोनच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथे घडली. राणी सतीश लांडगे (२९, रा. अजंठानगर, चिंचवड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, अरविंद शेषराव गाडे (३०, रा. अजंठानगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.

अधिक वाचा :पुण्यातील मॉल, मार्केट 5 ऑगस्टपासून सुरू

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली. अरविंद हा त्या महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. याबाबत महिलेचा पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले. मात्र, अरविंद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 

अधिक वाचा : पुणे जिल्ह्यात जुलैअखेर अवघा 20 मि.मी. पाऊस

अरविंद वारंवार फोन करीत असल्याने त्या महिलेने मागील महिन्यात मोबाईल क्रमांक बदलला होता. त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने महिलेवर धारधार शस्त्राने वार केले. दरम्यान ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले आहेत. त्याच्यावर पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.