Wed, Jun 03, 2020 01:47होमपेज › Pune › पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार, तारीख सुद्धा ठरली!

पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार, तारीख ठरली!

Last Updated: Oct 10 2019 4:50PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेपुणे : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पावसामुळे रद्द झालेली सभा येत्या सोमवारी (दि.14) कसबा मतदारसंघात होणार आहे. मात्र, सभेचे ठिकाण अद्याप निश्चित झाले नसून लवकरच ते ठरवले जाणार असल्याची माहिती कसबा विधानसभा मतदार संघातील उमेदवार अजय शिंदे यांनी दिली.

राज ठाकरे बुधवारी नातुबाग मैदानात सभा घेण्यासाठी दाखल झाले होते. तसेच नागरिकांनीही सभेसाठी गर्दी केली होती. मात्र, त्याचवेळी तुफान पाऊस पडल्याने ही सभा रद्द करावी लागली. परंतू ही सभा परत होणार असल्याचे मनसेने गुरूवारी जाहीर केले आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी गुरूवारी सकाळी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आमित ठाकरे, मनसेचे शहराध्यक्ष व कसब्यातील उमेदवार अजय शिंदे, कॅन्टोन्मेंटच्या उमेदवार मनीषा सरोदे, शिवाजीनगर येथील उमेदवार सुहास निम्हण आदी उपस्थित होते.