Sat, Oct 31, 2020 15:07होमपेज › Pune › पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)

पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)

Last Updated: Feb 27 2020 2:39AM
पुणे : प्रतिनिधी

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदचे आमदार अनिल भोसले यांना अटक करण्यात आली आहे. संचालक मंडळात असताना खोट्या नोंदी करून हजारो ठेवीदारांचे पैसे हडपल्याचा अनिल भोसले यांच्यावर आरोप आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतरांना शिवाजीनगर न्यायालयाने सहा मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनिल भोसले यांच्या अटकेमागे आर्थिक घोटाळ्याच्याबरोबरच अनेक राजकीय पदरही आहेत. ऐन अधिवेशनाच्या काळात सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराला अटक करण्यात आल्‍याने खळबळ उडाली आहे. 

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अतिशय सर्वसामान्य असे सोळा हजारहून अधिक ठेवीदार आहेत. या ठेवीदारांची चारशे कोटींहून अधिक रक्कम या बँकेत अडकली आहे. अनिल भोसले यांनी संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट नोंदी करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या लेखापरीक्षणात एक्‍काहत्‍तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे, पण पोलिस तपासात घोटाळ्याचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कष्ट करून पै - पै साठवलेले पैसे गुंतवलेले हजारो ठेवीदार या प्रकारामुळे धास्‍तावले आहेत.

 "