Thu, Jan 21, 2021 00:25होमपेज › Pune › पुणे: दौंडचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह

पुणे: दौंडचे भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 07 2020 4:35PM
पुणे (राहु/यवत) : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढताना दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. आ. कुल यांनी स्वतः याबाबत आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.

दरम्‍यान, आमदार राहुल कुल यांच्या कुटुबियांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यात सर्व कुटुंबियांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची असल्याची माहिती आ. कुल यांनी दिली आहे. आमदार राहुल कुल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना तपासणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही असा संदेश त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दिला आहे.