Wed, Sep 23, 2020 02:01होमपेज › Pune › 'कोरेगाव-भीमा'त कर्नाटक सरकारचा निषेध  (video)

'कोरेगाव-भीमा'त कर्नाटक सरकारचा निषेध (video)

Last Updated: Aug 09 2020 12:02PM

संग्रहीत छायाचित्रकोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकमधील मनगुंटी या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जागेवरून हटवल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील मुख्य चौकात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच पुतळा परत बसविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

‘मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाणांना काढा’

शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील व जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपतालुका प्रमुख आण्णा हजारे, रोहिदास शिवले, मधुकर भंडारे, संतोष भालेराव, गोविंद कांबळे, संग्राम ढेरंगे, सिद्धेश्वर माने, प्रकाश काशीद आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

 "