Wed, May 12, 2021 02:23होमपेज › Pune › कोरोना लढ्यातील पोलिसांना आपत्ती सेवा पदकाने गौरविण्यात येणार

कोरोना लढ्यातील पोलिसांना आपत्ती सेवा पदकाने गौरविण्यात येणार

Last Updated: May 23 2020 6:09PM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिवसरात्र पोलिस रस्तावर उभे राहून कर्तव्य पार पाडत आहेत. या कालावधीत अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला. अशा कठीण प्रसगांत पोलिस कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. त्यामुळे या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती सेवा पदक अथवा इतर पदकांनी लवकरच गौरविण्यात येणार आहे.

या दृष्टीकोनातून आवश्यक असणारा प्रस्ताव तत्काळ गृहविभागाकडे पाठविण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप पडणार आहे.

अधिक वाचा : बारामती : माळेगाव साखर कारखान्यात कामगारांचा अपघात  

सध्या कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून त्यामध्ये पोलिस कायदा सुव्यवस्था राखणे, सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत करण्याचे काम करत आहेत. या लढ्यात मुख्यत्वे पोलिस शिपायापासून ते निरीक्षकांपर्यंत रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यानुळे काहींना मृत्यूला देखील सामोरे जावे लागले आहे. तरीही जीवाची पर्वा न करता अशा पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपत्ती सेवा पदकाने गौरविण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठवावा, अशा सचूना महासंचालक कार्यालयास गृहविभागाने दिल्या आहेत. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी हा आदेश काढला आहे.

अधिक वाचा : पुण्यातील डॉक्टरचा 'कोरोना'मुळे मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा, महानगर पालिका प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. 23 मार्च पासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर संचारबंदी व नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तावर तैनात झाले. तेव्हापासून पोलिस आजतगायत कामच करत आहेत. अनेक पोलिस करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात देखील कर्तव्य बजावत आहेत. 

अधिक वाचा : बारामतीच्या तांदुळवाडी भागात युवकाला कोरोना 

दरम्यान राज्यात १६०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रसंगी कर्तव्यापुढे आपल्या परिवाराची चिंता न करता पोलिस कोरोना विरुद्धचा लढा देत आहेत. सुरूवातीपासून पोलिस दलात चांगले काम केल्यानंतर त्यांना रिवॉर्ड किंवा एखादे पदक देऊन गौरविण्यात येते. पोलिस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालाक, राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येते. तसेच, पोलिस दलात पदक मिळणे हे देखील एक गौरवास्पद आणि अभिमानाची गोष्ट असते.