Thu, Jul 02, 2020 17:27होमपेज › Pune › सोयी-सुविधांअभावी मैदाने धूळखात

सोयी-सुविधांअभावी मैदाने धूळखात

Published On: Jun 29 2018 12:57AM | Last Updated: Jun 28 2018 11:18PMपिंपरी : संजय शिंदे

नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर नंबर 4, 9 आणि 10 मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीयस्तराची बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट आणि हॉकी मैदान तयार करून सव्वा वर्षापूर्वी महापालिका भूमी जिंदगी विभागाकडे तर भूमी जिंदगी कार्यालयाने दोन दिवसात ती मैदाने क्रीडा प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहेत; परंतु क्रीडा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे ती मैदाने खेळाडूंसाठी आजमितिलाही खुली न केल्याने  खेळाडूमध्ये नाराजी सूर उमटला आहे.

नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर 4 मध्ये टेनिस बॉल कोर्ट, सेक्टर नंबर 9 मध्ये बास्केटबॉल कोर्ट आणि सेक्टर नंबर 10 मध्ये हॉकी मैदान उभारले आहे. प्राधिकरणाने ही मैदाने विकसित करून 14 मार्च 2017 ला   पालिकेच्या भूमी जिंदगी कार्यालयाकडे हस्तांतरित केली. त्यानंतर दोन दिवसातच भूमी जिंदगी विभागाने ही तीन्ही मैदाने क्रीडा प्रशासनाकडे हस्तांतरीत केली. त्याला आजमितिस जवळपास सव्वा वर्ष उलटून गेली आहेत. शहराला औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते.

या ओळखीबरोबर क्रीडानगरी होण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्या काळात क्रीडा धोरणासाठी प्रयत्न झाले होते. त्यात शहरातील विविध क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, मार्गदर्शक, क्रीडा संस्था, खेळाडू यांची मते घेऊन क्रीडा धोरण राबविण्यात येणार होते; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या धोरणाला ब्रेक लागला आहे. मात्र किमान पालिकेकडे क्रीडा कार्यलय स्वतंत्र विभाग असताना ही क्रीडा मैदानांची होणारी दुरवस्था पाहता क्रीडा विभाग सक्षम करण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया क्रीडा संघटना, खेळाडू यांच्यात   उमटत  आहे. मुलभूत सुविधांसाठी क्रीडा विभागाने पालिका प्रशासानाकडे केलेल्या मागणीला महत्व मिळत नसल्यामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे.   क्रीडा प्रशासनाने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पालिका उदासिन असल्याने सर्व सोयीनयुक्त मैदाने खेळाडूनिवा ओस पडल्याचे पहावयास मिळत आहे. टोलमधून लालपरीला वगळणे या गोष्टी शासनाला सहज शक्य होत्या. मात्र, भाडेवाढीचा पर्याय निवडून हा सगळा भार प्रवाशांवर टाकला. अनेक गरजू प्रवासी केवळ एसटीनेच प्रवास करतात. त्यांना आता आर्थिक भुर्दंड बसणार असून त्यांनी जायचे कोठे, असा सवाल प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आला आहे.