पुणे : पुढारी वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील उड्डाणपूल पीएमआरडीएच्या वतीने आज मंगळवारी (दि.१४) रोजी पाडण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने या उड्डाणपुलाचे बांधकाम तोडण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात पूल पाडला जात असल्याने प्रशासनाच्या वतीने सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे. तर यासाठी पुलाची एक बाजू पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
वाचा : सचिन पायलट यांच्या पत्नीच्या 'त्या' ट्विटने खळबळ
पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, कंत्राटदार कंपनी टाटा प्रोजेक्टचे प्रतिनिधी, पीएमआरडीएच्या अधिक्षक अभियंता रिनाझ पठाण, कार्यकारी अभियंता भारतकुमार बाविस्कर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूल तोडण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. याठिकाणी नारळ वाढवून उड्डाणपूल पाडायला सुरुवात केली आहे. यानंतर याचा आढावा स्थानिक आमदार सिद्धर्थ शिरोळे यांनी घेतला आहे.
वाचा : व्हॉट्सॲप वापरताय, तर मग ही बातमी वाचाच!