Sat, Nov 28, 2020 19:27होमपेज › Pune › राज्यातील बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश

राज्यातील बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश

Published On: Dec 17 2017 2:46AM | Last Updated: Dec 17 2017 2:46AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणार्‍या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी राज्यातील बारा जिल्हाधिकार्‍यांना अटक करून हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहेत. याबाबतचे जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात हे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, नागपूर, भंडारा, बीड, लातूर, परभणी, जालना व जळगाव या बारा जिल्ह्यांमधील भूजल पातळीतील फ्लोराईडचे अतिप्रमाण दातांचा व हांडाच्या गाड्याचा फ्लोरिसिस वाढविण्यासाठी कारणीभूत असल्याची गंभीर बाब याचिकेतून राष्ट्रीय हरित लवादासमोर मांडण्यात आली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 12 जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने तसेच आरोग्य विभागाचे राज्य सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर विभागांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.