Fri, Sep 25, 2020 14:38होमपेज › Pune › बारामतीमधूनच उपमुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांनी केला मोठा खुलासा!

बारामतीमधूनच उपमुख्यमंत्रिपदावरून अजित पवारांनी केला मोठा खुलासा!

Last Updated: Dec 10 2019 1:27AM

अजित पवार (संग्रहित छायाचित्र)बारामती : प्रतिनिधी

ज्या बारामतीकरांनी मला 1 लाख 65 हजारांचे मताधिक्य देत राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी केले, त्यांची कामे मला करायची आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटते मला उपमुख्यमंत्री करावं, पण हा निर्णय पक्ष प्रमुखांचा आहे, अशी स्पष्टोक्ती आमदार अजित पवार यांनी दिली.

मी व देवेंद्र फडणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काही तरी सुरु झालय असे समजण्याचे काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले. सोमवारी (दि. 9) बारामतीच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांनी पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले. मी आणि देवेंद्र फ़डणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालय अस समजण्याच कारण नाही, आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्यात अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस व त्यांच्या भेटीचे मिश्किल शैलीत वर्णन केले. 

पवार म्हणाले, की राजकीय व्यक्ती कधी कायमच्या एकमेकांच्या दुश्मन नसतात, सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार होतो, एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसर काहीही नव्हतं. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला व इतरांना बोलावल हो  म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो, खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी व देवेंद्र यांची खुर्ची शेजारी शेजारी आली इतकच. त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची तिकडची चर्चा केली. कसं काय पाऊस पाणी वगैरे या पद्धतीची आमची चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.

दरम्यान, पवार यांनी सोमवारी बारामती शहर व तालुक्यातील कामे मोठ्या प्रमाणावर मार्गी लावली. सकाळी सहयोग सोसायटी येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात त्यांनी नगरपरिषदेचे पदाधिकारी-नगरसेवक, बारामती दूध संघाचे संचालक मंडळ, तसेच सोमेश्वर कारखान्याचे पदाधिकारी, संचालक व शेतकरी कृती समिती यांच्यासोबत बैठका घेतल्या. 

फडणवीसांच्या मुलाखतीवर बोलणार नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, मला बारामतीची प्रचंड कामे आहेत, त्यांची कामे करणे हेच माझे एकमेव काम आहे, तेच मी करत राहणार आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्रीच काय ते अधिक विस्ताराने सांगू शकतील असेही पवार म्हणाले. बारामतीकरांनी 1 लाख 65 हजारांचे मताधिक्य देऊन जबाबदारी सोपविली आहे, त्या मुळे बारामती मतदारसंघांचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे पहिले काम असून तेच मी करत आहे. 

 "