Sun, Sep 20, 2020 03:57होमपेज › Pune › पिंपरी : डोक्यात दगडी पाटा घालून तरुणाचा खून

पिंपरी : डोक्यात दगडी पाटा घालून तरुणाचा खून

Last Updated: Aug 22 2020 7:08PM

संग्रहीत छायाचित्रपिंपरी : पुढारी वृत्तसेव

पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगडी पाटा घालून तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे हनुमान मंदिरासमोर शनिवारी (दि.२२) घडली. शंकर गोविंद सुतार (२३, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी नीला गोविंद सुतार (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष चौगुले (वय २५), अजय कांबळे (वय २३), मोसीन शेख (वय २५), पप्पू पवार (वय २८, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर रात्री हनुमान मंदिरासमोर झोपला. त्यावेळी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच, दगडी पाटा डोक्यात घातला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 "