Sat, Mar 28, 2020 16:28होमपेज › Pune › पुणे : कृषी परिषदेसमोर विद्यार्थ्यांचे मुंडन आंदोलन (video)

पुणे : कृषी परिषदेसमोर विद्यार्थ्यांचे मुंडन आंदोलन (video)

Last Updated: Feb 27 2020 3:01PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या मुख्यालयासमोर राज्यातील कृषी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज दुपारी मुंडन आंदोलन केले. कृषी पदव्युत्तर पदवीला व्यवसायिक दर्जा घोषित करावा आणि कृषी पदव्युत्तर पदवीच्या बंद झालेल्या सर्व शिष्यवृत्ती पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ववत चालू कराव्यात व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता चालू करण्याच्या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन द्यावे अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती अनिरुद्ध मदने व अन्य विद्यार्थ्यांनी दिली.