Sat, Mar 28, 2020 16:33होमपेज › Pune › पुणे स्टेशनवर आता 'ही' सुविधाही मिळणार!

पुणे स्टेशनवर आता 'ही' सुविधाही मिळणार!

Last Updated: Feb 18 2020 1:48AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे रेल्वे स्टेशनवर आता मोबाइल चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. दहा ठिकाणी असे मोबाइल चार्जिंगकरिता बूथ उभारण्यात येणार असून त्यापैकी एक प्रायोगिक तत्त्वावर येथे बूथ उभारला गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 

अधिक वाचा : यशवंत व्हा!; उद्यापासून बारावीची परीक्षा

पहिल्या टप्प्यात पुणे स्टेशनवर दहा ठिकाणी अशी बूथ उभारण्यात येणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बूथची संख्या हळूहळू वाढविण्यात येईल. पुण्यापाठोपाठ शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, कोल्हापूर, मिरज, खडकी येथेही मोबाइल चार्जिंग बूथ उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती देण्यात आली.

अधिक वाचा : अशोक चव्हाणांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण

रेल्वेतून प्रवास करण्याआगोदर प्रवाशांना कळते की त्यांचा मोबाइल डिस्चार्ज झाला आहे. अशावेळी त्यांना महत्त्वाचा फोन करता येत नाही, तसेच आलेला कॉलही उचलता येत नाही. पुणे स्टेशनवरून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी विविध ठिकाणी ये-जा करतात. यापैकी दहा ते बारा टक्के प्रवाशांच्या मोबाइलची बॅटरी डिस्चार्ज झाल्याचे स्टेशनवरच त्यांना निदर्शनास येते. अशा प्रवाशांकरता मोबाइल चार्जिंग बूथ वरदानच ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक वाचा : 'हिंमत असेल तर फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी'

अवघ्या काही मिनिटांत या मोबाइल चार्जिंग बूथ वर मोबाइलची पूर्ण बॅटरी चार्ज होऊ शकेल. एका खासगी कंत्राटदाराला याचे कंत्राट मिळाले असून त्यातून नॉन शेअर रेव्हेन्यू मिळेल, असेही सांगण्यात आले.