Wed, May 27, 2020 02:30



होमपेज › Pune › बारामतीत लाखो रूपयांचा गुटखा जप्त

बारामतीत लाखो रूपयांचा गुटखा जप्त

Last Updated: Feb 26 2020 2:02PM




बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती शहर व दौंडमध्ये चार गुटखा विक्रेत्यांवर अप्पर पोलिस अधीक्षकांच्या गुन्हे शाखेने छापे टाकले. या छाप्यात २.१४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. चार गुटखा विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज रमेश साळुंखे, सचिन संपतलाल कोठारी, हस्तीमल जवाहरलाल पितळे व प्रवीण सुरेश बारवकर अशी गुन्हा दाखल झालेल्या गुटखा विक्रेत्यांची नावे आहेत. 

या कारवाईत साळुंखे याच्याकडून ७७ हजार ३५०, कोठारी याच्याकडून ९५ हजार ४६० रुपयांचा तर पितळे याच्याकडून ३७ हजार ९६० व बारवकर याच्याकडून ३७५२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मिना यांना यासंबंधीची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईचे आदेस गुन्हे शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिले होते. 

बारामती शहरातील जामदार रस्ता व आमराई परिसरात जात या शाखेने माहिती घेतली. गुन्हे शाखेसह बारामती शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित जात छापा टाकला. यावेळी अवैधरित्यासाठा केलेला गुटखा मिळून आला. तो जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाशी पोलिसांनी पत्र व्यवहार केला. साळुंखे व कोठारी विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात तर पितळे व बारवकर यांच्या विरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. 

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, सिद्धेश पाटील, आरसीपी पथकातील 11 कर्मचाऱ्यानी या कारवाईत भाग घेतला.