Sun, Sep 20, 2020 04:23होमपेज › Pune › पुणे : मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव (Live)

पुणे : मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव (Live)

Last Updated: Sep 17 2020 11:48AM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून आपली बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून घेराव घालण्यात आला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात काय आहेत मागण्या...

न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे ती त्वरीत राज्य सरकारने उठवावी. सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला विद्यार्थ्यांसाठी भरघोस आर्थिक मदत द्यावी, न्यायालयाच्या निर्णयापुर्वी विद्यार्थ्यांचे जे प्रवेश झाले ते संरक्षित करावेत. तसेच, २०१४च्या नियुक्‍तीचा प्रश्‍न मार्गी लावावा, ४३ मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनप्रसंगी राजेंद्र कुंजीर, बाळासाहेब आमराळे, धंनजय जाधव, सचिन आडेकर, तुषार काकडे, मीना जाधव, जगजीवन काळे, अमर पवार, युवराज दिसले, सुनीता जाधव, प्राची दुधाने, किशोर मोरे, गणेश सोनवणे यांसह मराठा समन्वयक उपस्थित होते. 

 "